मीरत
मीरत : मेरठ. उत्तर प्रदेश राज्याच्या मीरत जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५,३८,४६१ (१९८१). हे उत्तर रेल्वेच्या दिल्ली–सहारनपूर या मुख्य मार्गावर दिल्लीच्या ईशान्येस ६४ किमी. अंतरावर वसले आहे. उत्खननात मिळालेले बौद्धकालीन अवशेष व येथून दिल्लीस नेलेला अशोकस्तंभ यांच्या अभ्यासावरून मीरत शहर प्राचीन असावे.